गुहागरमध्ये खारवी समाजाचा एल्गार
गुहागर :
मच्छीमार बोटीवरील तांडेल रविंद्र काशीराम नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला करून निघृण हत्या करणाऱ्या नराधमाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, या मागणी बरोबरच मच्छीमारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बुधवारी गुहागर मध्ये अखंड खारवी समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथून गुहागर तहसील कार्यालयापर्यंत जनअक्रोश मोर्चा काढून तहसीलदारांकडे निवेदन सादर करण्यात आले अरबी समाजाने सुमारे 3 हजार जनसमुदायाची उपस्थिती दाखवून आपल्यावर झालेल्या अन्यायावर न्यायाची मागणी केली आहे.
रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील खारवी समाज समिती तर्फे हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला अतिशय शिस्तबद्ध व आपल्या मागण्या तेवढ्याच प्रखरतेने मांडून हा मोर्चा गुहागर पोलीस परेड मैदानावर दाखल झाला त्या ठिकाणी प्रशासनाकडे देण्यात येणाऱ्या विविध मागण्यांचे निवेदनाचे वाचन करण्यात आले व त्यानंतर गुहागर तहसीलदार गुहागर पोलीस ठाणे यांच्याकडे निवेदन सादर करून मोर्चा संपवण्यात आला. 20 ऑक्टोबर 2024 रोजी साखरी आगर येथील मच्छीमार रविंद्र काशीराम नाटेकर यांच्यावर मासेमारी करताना त्यांच्याच बोटीवरील झारखंड येथील खलाशी म्हणून काम करणाऱ्या जयप्रकाश विश्वकर्मा याने सुरीने तांडेल रविंद्र नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला करून निघृण हत्या केली. तसेच बोट पेटवून दिली होती. अतिशय घृणास्पद, मानवी जातीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करून अशा पाशवी कृत्य करणाऱ्या नराधमाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी. तसेच संबधित घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालव वण्यात यावा. या घटनेचा निःपक्षपातपणे पोलीस तपास व्हावा अशी मागणी, त्याचबरोबर मच्छीमारांचे प्रलंबित प्रश्नांवर विविध मागण्या या जन आक्रोश मेळाव्यातून करण्यात आली.
दरबारी देण्यासाठी अखंड खारवी समाज रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील खारवी समाज समिती गुहागरचे अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.