Kolhapur : यमेकोंडमध्ये हत्तीचा धुमाकूळ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
धान्याच्या गोदामावर हत्तीचे आक्रमण; शेतकरी चिंतेत
किणे : यमेकोंड परिसरात हत्तीने धुमाकूळ घातला असून या परिसरामध्ये हतीकडून नुकसानीचे सत्र सुरूच आहे. मळणी काढून भात भरून ठेवलेल्या शेतामधील धान्याच्या पिशब्या हत्ती विस्कटून टाकत आहेत. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार तरी किती असा सवालही शेतकरी करत आहेत.
येमेकोंड येथील महादेव होडगे, उत्तम होडगे, रामचंद्र कुंभार, कृष्णा होडगे, बसंत तिबिले, भीमराव तिबिले, नारायण तिबिले, मारुती कांबळे, सचिन जाधव, शामराव पंडित, अशोक कसलकर या शेतकऱ्यांचे भात ऊस व नाचणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
बुधवारी सकाळी चंद्रकांत देसाई यांनाहतीचे दर्शन झाले. सकाळी सुमारे पंधरा मिनिटे हत्तीने रस्ता अडवून ठेवला होता. दररोज वाहनधारकांना हत्ती दर्शन देत असल्यामुळे या मार्गावरून रात्रीचे प्रवास करणे धोकादायक बनले आहे.