चंदगडच्या पुर्व भागात हत्तीचे दर्शन; हत्तीच्या आगमनाने चंदगड तालुका भयभीत
कोवाड वार्ताहर
चंदगड तालुक्यातील पूर्वेकडील भागात शनिवार दि.२४ सकाळी 7 च्या सुमारास भल्या मोठ्या हत्तीचे अनेकांना हत्तीचे दर्शन झाले . वीस वर्षापूर्वी याच परिसरातील होसुर गावातील सौ. लीला पाटील या महिलेला गावा जवळील शिवारात टस्कर हत्तीने चिरडून ठार केले होते.
यामुळे या भागात भीतीचे वातावरण झाले आहे. किटवाड येथून नोकरी निम्मित कोवाड कडे येत असताना प्रा. के एन तेऊरवाडकर यांनी किटवाड कुदनुर रस्त्या च्या बाजूच्या टेकावर हत्ती दिसला.त्यानंतर वैरणासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी भला मोठा हत्ती पाहताच गावात येवून सर्वांना सावध केले.हा हत्ती सकाळी 9 वाजता कालकुंद्री येथील ओळी टेकावर या हत्तीचे आगमन झाले. गावा गावात हत्ती आलाय सावध रहा असा संदेश ग्रामस्थ एकमेकांना पोहचवत आहेत. दरम्यान कोवाड परिसरातील शिवारात सद्या ऊस तोडणी चे काम अंतीम टप्प्यात आहे. बीड जिल्हा तून आलेले तोडणीदार आपल्या बायकां मुलासह शिवारात च झोपड्या बांधून रहायला आहेत. हत्तीच्या आगमनाने ऊस तोडणीदर ही भीतीच्या छायेत वावरत आहेत.