For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Chnadgad | चंदगड तालुक्यात हत्तीचा थरार; वाहनांची तोडफोड करत गावात धुमाकूळ

01:47 PM Mar 01, 2026 IST | NEETA POTDAR
chnadgad   चंदगड तालुक्यात हत्तीचा थरार  वाहनांची तोडफोड करत गावात धुमाकूळ
Advertisement

                       चंदगड तालुक्यात हत्तीचा वाढता उपद्रव;

Advertisement

चंदगड - चंदगडतालुक्याच्या पश्चिम भागात हत्तीच्या वाढत्या उपद्रवाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच न्हावेली-उमगाव मार्गावरील खळणेकरवाडी येथे पहाटे घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला. पहाटे सुमारे चारच्या सुमारास मानवी वस्तीत घुसलेल्या एका महाकाय हत्तीने वाहनांची तोडफोड करत भीषण उत्पात माजवला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.

झोपेत असलेल्या नागरिकांना काही समजण्याच्या आतच रौद्ररूप धारण केलेल्या गजराजाने धुमाकूळ घातला. विराज सामंत यांच्या घरासमोरील वॅगनआर (जीए ०३ वाय१७९२) हत्तीच्या मार्गात आल्याने संतप्त हत्तीने सोडेच्या जबरदस्त फटक्यात ती गाडी अक्षरशः हवेत उडवून काही अंतरावर फेकली. या धडकेत चारचाकीचा चेंदामेंदा झाला. एवढ्यावर न थांबता परिसरातील दोन640371792 ते तीन दुचाकीही पायाखाली तुडवत हत्तीने चिरडल्या. हत्तीच्या ओरडण्याचा व वाहनांच्या कोसळण्याचा कर्कश आवाज आणि धातूच्या तुकड्यांचा गडगडाट यामुळे संपूर्ण वाडी जागी झाली. मात्र भीषण दृश्यामुळे कोणालाही घराबाहेर पडण्याची हिंमत झाली नाही. काही काळ परिसरात मृत्यूचे भय दाटून आले होते.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तुषार गायकवाड सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून सतर्क राहण्याचे आवाहन नागरिकांनी विशेषतः रात्रीच्यावेळी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. काही महिन्यांपासून चंवगड तालुक्यात हत्ती व इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून शेतीपिके, घरे व वाहने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. हत्तीचा उपद्रव रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना, संरक्षक कुंपण उभारणी, नियमित गस्त तसेच नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई वेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

शासनाकडून याबाबत काय ठोस निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.