For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इलेक्ट्रॉनिक्स उद्योग देणार 10 लाख नोकऱ्या

06:07 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
इलेक्ट्रॉनिक्स उद्योग देणार 10 लाख नोकऱ्या
Advertisement

वर्ष 2025 पर्यंत हा टप्पा प्राप्त होणार असल्याचा अंदाजही संशोधनातून सादर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात 2025 पर्यंत आणखी 10 लाख नोकऱ्या निर्माण होतील असा अंदाज आहे. वर्कफोर्स मॅनेजमेंट सोल्यूशन प्रदाता क्यूस कॉर्प एलटीडीच्या संशोधनानुसार, भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाने मार्च 2024 मध्ये भरतीमध्ये 154 टक्के वाढ नोंदवलेली आहे. संशोधनात असे आढळून आले की, दूरसंचार क्षेत्रात उमेदवारांची मागणी सर्वाधिक आहे, जी एकूण भरतीच्या 64 टक्के आहे.

Advertisement

लाइटनिंग आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्र अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. भौगोलिकदृष्ट्या, तामिळनाडू 33 टक्के वाटासह इलेक्ट्रॉनिक्स भरती मागणीमध्ये अव्वल आहे, असे क्यूस कॉर्प एलटीडीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा ही राज्ये त्या पाठोपाठ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महिलांचा वाढता सहभाग!

संशोधनातून असे दिसून आले आहे की इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महिलांचा सहभाग झपाट्याने वाढत आहे, विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात. आता इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात 78 टक्के महिलांचा समावेश आहे. ऑपरेटर, गुणवत्ता हमी व्यावसायिक आणि चाचणी यासारख्या विभागांमध्ये त्यांची अधिकाधिक भरती केली जात आहे. काही कंपन्यांमध्ये एकूण कर्मचाऱ्यांपैकी 80 टक्के स्त्रिया आहेत. संशोधनात असे म्हटले आहे की इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात महिलांच्या रोजगारात वाढ होण्यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत.

 कोणत्या नोकऱ्यांना जास्त मागणी?

संशोधन असे दर्शविते की इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात इलेक्ट्रॉनिक अभियंते, इंस्ट्रुमेंटल अभियंता आणि इलेक्ट्रॉनिक डिझाइन अभियंता यासह अशी अनेक पदे आहेत ज्यांना जास्त मागणी आहे. या नोकऱ्यांसाठी सरासरी पगार 18,000 रुपये  ते 32,000 रुपये प्रति महिना असतो. या नोकऱ्यांमध्ये विशेषत: 18 ते 30 वयोगटातील व्यक्तींची नियुक्ती केली जाते. विशेषत: तरुणांना यामध्ये प्राधान्याने सामावून घेतले जाते.

लोहित भाटिया, प्रेसिडेंट, वर्कफोर्स मॅनेजमेंट, क्यूस कॉर्प म्हणतात की भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योग नाविन्यपूर्ण बदलांमुळे वेगाने वाढत आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की 2025-2026 पर्यंत 1 दशलक्ष नोकऱ्या निर्माण होतील आणि 2025 पर्यंत बाजाराचा आकार 400 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल.

अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की, आजकाल इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सेवा (ईएमएस) क्षेत्रात तात्पुरत्या आणि कंत्राटदार कर्मचाऱ्यांना अधिक महत्त्व दिले जाते.

Advertisement
Tags :

.