महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अधिवेशनासाठी ग्रामीण भागात वीजपुरवठा ठप्प

11:12 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हेस्कॉमच्या कारभाराबाबत तीव्र संताप : लघुउद्योजकांसह व्यावसायिकांना मोठा फटका

Advertisement

बेळगाव : अधिवेशनाच्या तयारीसाठी ग्रामीण भागात बुधवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित ठेवल्याने ठेवल्याने हेस्कॉमच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून उचगाव व हिंडलगा उपकेंद्रांतून वीजपुरवठा बंद करण्यात आला. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक दिवसभर वीजपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. याचा फटका लघुउद्योजकांसह व्यावसायिकांना बसला. 4 डिसेंबरपासून बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन घेतले जाणार आहे. अधिवेशनकाळात विजेच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी चाचणी घेतली जात आहे. बेळगावच्या हक्काचा वीजपुरवठा सुवर्णविधानसौधला पुरविला जात असल्याने ग्रामीण भाग मात्र अंधारात सापडला आहे. बुधवारी सकाळी 7 वाजता वीजपुरवठा अचानक खंडित करण्यात आला. पूर्वसूचना न देता वीज खंडित करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. दिवसभर वीज नसल्याने लघुउद्योजकांसह घरबांधणी, गृहोद्योगांना फटका बसला. वीज नसल्याने कामगारांना माघारी धाडावे लागले. सायंकाळी उशिरा वीजपुरवठा सुरळीत  झाला. नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल नाराजी व्यक्त होत होती. वीजपुरवठा खंडित करायचा होता तर पूर्वसूचना का दिली नाही? असा सवालही विचारण्यात येत होता.

Advertisement

हिंडलगा, उचगाव उपकेंद्रांतून वीजपुरवठा ठप्प

सध्या अधिवेशनासाठी वीजपुरवठ्याची चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपासून हिंडलगा व उचगाव उपकेंद्रांतून पुरवठा होणाऱ्या गावांमध्ये वीजपुरवठा ठप्प होता. अधिवेशनासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article