For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्यापासून दोन दिवस विविध भागात वीजपुरवठा खंडित

10:42 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
उद्यापासून दोन दिवस विविध भागात वीजपुरवठा खंडित
Advertisement

बेळगाव : सुवर्ण विधानसौध उपकेंद्रामध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेल्या या उपकेंद्राच्या व्याप्तीत येणाऱ्या बेळगाव शहर, शहापूर आणि परिसरात शनिवार दि. 25 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. केएचबी कॉलनी, अलारवाड, सुवर्ण विधानसौध लाईन 1-2, बसवेश्वर चौक, जोशी गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवाण गल्ली, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, मारुतीनगर, हरिकाका कंपाऊंड, साई कॉलनी, येडियुराप्पा मार्ग, हलगा रस्ता, जुने बेळगाव, खासबाग, बसवाण गल्ली, बाजार गल्ली, मारुती गल्ली या परिसरात वीजपुरवठा खंडित होणार आहे. दि. 26 रोजी नेहरूनगर विद्युत केंद्राच्या व्याप्तीत येणाऱ्या परिसरात सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. या उपकेंद्राच्या व्याप्तीत येणाऱ्या हिंडाल्को, वैभवनगर, शिवबसवनगर, शिवाजीनगर, सदाशिवनगर, जिना बकुळ फोर्ज, सिव्हिल हॉस्पिटल, सुभाषनगर, विश्वेश्वरय्यानगर, केएलई हॉस्पिटल फिडर, कुमारस्वामी लेआऊट, हनुमाननगर, सह्याद्रीनगर या भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.