Aajara News : विजेचा धक्का बसल्याने बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू, घरावर शोककळा
एकाचवेळी घरातील दोन कर्ते पुरुष गेल्याने घरावर शोककळा पसरली
आजरा : वीजेचा धक्का बसून कोवाडे येथील आप्पा रामचंद्र पोवार (वय ६५) व रवींद्र आप्पा पोवार (वय ३५) या बाप-लेकाचा मृत्यू झाला. कोवाडे येथील पोवारची मळवी नावाच्या शेतात ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकाचवेळी घरातील दोन कर्ते पुरुष गेल्याने घरावर शोककळा पसरली आहे.
कोवाडे येथील पोवार कुटुंबियांचा रवींद्र हा एकुलता मुलगा होता. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तो मुंबई येथे खाजगी आस्थापनेत नोकरी करत होते. दरवर्षी परिसरातील गावांच्या यात्रा असतात. त्यानिमित्त वडरगे, चव्हाणवाडीच्या यात्रेकरीता रवींद्र हा पंधरा दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन गावी आला होता.
दरम्यान, रवींद्र याच्यासह वडील आप्पा यांचा देखील या घटनेते मृत्यू झाला. घरच्या दोन्ही कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्यामुळे पोवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरच्या कर्त्या पुरुषांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कोवाडेसह परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडू या घटनेचा पंचनामा झाला असून नोंद करण्याचे काम सुरु आहे.