For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur news | सोलापुरात उन्हाच्या झळांसोबत विजेचा लपंडाव; ४२ अंश तापमानात नागरिक घामाघूम

04:25 PM Apr 26, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   सोलापुरात उन्हाच्या झळांसोबत विजेचा लपंडाव  ४२ अंश तापमानात नागरिक घामाघूम
Advertisement

                       महावितरणचा 'ओव्हरलोड' सोलापूरकरांच्या जीवावर

Advertisement

सोलापूर - एप्रिलच्या कडक उन्हात शहरातील विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसाने सोलापुरात हजेरी लावली आहे. यामुळे थोडे जरी वारे आले तरी झाडांच्या फांद्या वायरवर पडत असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने झोपेचा खोळंबा होत असून, उकाड्याने सोलापूरकर नागरिक त्रस्त झाले आहेत.

सध्या तापमान ४२ अंशांवर गेल्याने विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विजेची मागणी वाढल्याने वितरण यंत्रणेवर ताण वाढला आहे. दिवसा सोलरमुळे भार कमी जाणवत असला तरी रात्री अचानक वाढणाऱ्या वापरामुळे फिडर व ट्रान्सफॉर्मर ओकरलोड होऊन ट्रिप होण्याचे प्रकार वाढले आहेत.

Advertisement

शहरातील मोठ-मोठे फिडर हा सर्वाधिक ताण सहन करत असून, तेथे वारंवार रिले ट्रिप होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली असल्याने सफार्मरवर अधिकचा ताण येत असल्याने देखील या ठिकाणी वायर ट्रिप होत असून वीजपुरवठा खंडित होत आहे. दरम्यान, महावितरणनेकाही उपाययोजना सुरू केल्या आहेत.

वीज बचतीचे आवाहन
महावितरणने नागरिकांना विजेची बचत करण्याचे आवाहन केले असून, एसीचा वापर २४ अंशांवर ठेवावा व अनावश्यक उपकरणे बंद ठेवावीत, अशी विनंती केली आहे. नवीन
ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यावर दोन दिवसांत दिलासा मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.

अभ्यासाचे वेळापत्रक कोलमडले
रात्री-अपरात्री वीज जाण्याने लहान मुले, वुद्ध व आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून, अभ्यासाचे वेळापत्रक कोलमडले आहे. रात्रभर जागरण करावे लागते.

उपाययोजना काय?
नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर महावितरणने काठी तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, भार विमागण्यासाठी सबस्टेशनकडून अतिरिक्त वीज प्रवाह जोडण्यात आला आहे. त्याचबरोबर शहर परिसरातील फिडरची विभागणी करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येत आहेत. या त्यानंतर वीजपुरवठा काही अंशी स्थिर होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.