हेस्कॉमकडून वीज वाहिनी दुरुस्तीचे काम सुरु
बेळगाव : हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून शहरात वीज पुरवठा ठप्प होता. तब्बल 12 तास वीजपुरवठा बंद राहिल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच हेस्कॉम प्रशासनाला जाग आली. रविवारी सकाळपासून हेस्कॉमचे कर्मचारी विद्युत वाहिनीच्या दुऊस्तीसाठी प्रयत्न करीत होते. शहराचा व्यावसायिक भाग समजल्या जाणाऱ्या खडेबाजार, आझाद गल्ली, माळी गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कामत गल्ली, खंजर गल्ली आदी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास वीजपुरवठा ठप्प झाला. त्या ठिकाणी वीजपुरवठा सुरू करणे गरजेचे होते. परंतु सेक्शन ऑफिसर तसेच इतर अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शनिवारी दुपारी
तीन वाजेपर्यंत वीजपुरवठा
बंद ठेवण्यात आला. संतापलेल्या नागरिकांनी हुबळीतील हेस्कॉम कार्यालयात तक्रार नोंदवल्यानंतर काही गल्ल्यांची दुऊस्ती झाली. परंतु काही भागात वीजपुरवठा खंडित होता. तरुण भारतने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध करताच हेस्कॉम अधिकाऱ्यांना जाग आली. पांगुळ गल्ली येथे ज्या ठिकाणी बिघाड झाला होता त्या ठिकाणी रविवारी दुऊस्तीचे काम करण्यात आले.