For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दिवाळीत विजेच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता

06:33 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिवाळीत विजेच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता
Advertisement

जपून वापर करण्याचे हेस्कॉमचे आवाहन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

यावर्षी ऑक्टोबर हिटने सर्वाधिक उच्चांक गाठल्याचे दिसत आहे. असह्या होणाऱ्या उष्म्यामुळे विजेची मागणी कमालीची वाढली आहे. एकीकडे मर्यादित पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाणीसाठा कमी असून वीजनिर्मितीही मर्यादित होत आहे. पण दुसरीकडे वापर मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या पंधरा दिवसात दिवाळीचा सण असल्याने यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मे महिन्यापेक्षा अधिक उष्मा सध्या ऑक्टोबर महिन्यात जाणवू लागला आहे. उष्मा वाढताच झपाट्याने विजेची मागणी वाढत गेली. त्यामुळे हेस्कॉमकडून अघोषित भारनियमन करण्यास सुरुवात झाली. शहरासह ग्रामीण भागात दररोज 3 ते 4 चार तास अघोषित भारनियमन केले जात आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक असल्याने हे भारनियमन करावे लागत आहे.

ऑक्टोबर हिटमुळे फॅन, एसी, फ्रिज यासह इतर विद्युत उपकरणांसाठी विजेची मागणी वाढली आहे. आता येणाऱ्या दिवाळीमध्ये घरोघरी होणारी विद्युत रोषणाई, आकाशकंदील यामुळे विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीत बाजारपेठाही आकर्षक दिव्यांनी उजळून निघतात. त्यामुळे त्याचाही बोजा उचलावा लागणार आहे. विजेचा वाढलेला वापर पाहता आतापासूनच विजेचा जपून वापर करणे गरजेचे झाले आहे.

परतीच्या पावसानेही हात दिल्यामुळे धरणांमध्येही मर्यादित साठा उपलब्ध आहे. त्यामुळे भविष्यात विजेची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच विजेचा जपून वापर करण्याचे आवाहन हेस्कॉमकडून नागरिकांना केले जात आहे.

Advertisement
Tags :

.