For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन स्थगित

04:46 PM Mar 17, 2025 IST | Pooja Marathe
वीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन स्थगित
Advertisement

मागण्यांबाबत ऊर्जा विभाग सकारात्मक

Advertisement

कोल्हापूर

वीज कंत्राटी कामगारांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी १८ मार्च रोजी केले जाणारे आंदोलन ३१ मे पर्यंत स्थगित केले आहे. कामगारांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झाले असल्याचे ऊर्जा विभागाचे सचिव आ. भा. शुक्ला यांनी सांगितल्यामुळे संघटनेच्या वतीने आंदोलन काही दिवस स्थगित केले.

Advertisement

महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक मानव संसाधन परेश भागवत, तसेच मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आणि ऊर्जा विभागाचे अपर प्रधान सचिव आ. भा. शुक्ला यांच्या उपस्थितीमध्ये वीज कंत्राटी कामगारांच्या संघटना प्रतिनिधींची मंत्रालयात बैठक झाली. यामध्ये संघटनेने दिलेल्या पत्रातील समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वीज कंपनी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत, असे प्रधान सचिव आ. भा. शुक्ला यांनी स्पष्ट केल्यामुळे १८ मार्च रोजी विधान भवनासमोर आयोजित केलेले आंदोलन ३१ मे पर्यंत स्थगित केले आहे, अशी माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नीलेश खरात यांनी पत्रकाद्वारे दिली.

संघटनेने पत्राद्वारे मांडलेल्या वीज कंत्राटी कामगारांच्या सर्व प्रलंबित समस्या शासन व वीज कंपनी प्रशासनाच्या वतीने लवकरच पूर्ण केल्या जातील. दोषी कंत्राटदारांवर योग्य व कठोर कारवाई केली जाईल. कंत्राटदार विरहित कंत्राटी कामगार पद्धतीसाठीचा हरियाणा पॅटर्न तसेच राज्यातील कंत्राटी कांमगारांच्या किमान वेतन विषयी प्रलंबित असलेली वेतन वाढ, तसेच वीज उद्योगासाठी किमान वेतनाची स्वतंत्र श्रेणी निर्माण करणे आदी धोरणात्मक विषयासाठी एकत्रित संवाद साधून आगामी काळात या समस्या नक्कीच सोडवू असे आ. भा शुक्ला व महावितरणचे कार्यकारी संचालक परेश भागवत यांनी आश्वासित केले. त्यामुळे संघटनेच्या सर्व केंद्रीय प्रमुख पदाधिकारी तसेच ३६ जिह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व सचिव यांनी विधानसभेवरील भव्य मोर्चा तात्पुरता स्थगित करून शासन व प्रशासनाकडून प्रलंबित समस्यां लवकरात लवकर सोडवून घेण्यासाठी होकार दर्शवला.

Advertisement
Tags :

.