पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर मालवणातील वीज बिल भरणा केंद्र होणार सुरु
मालवण । प्रतिनिधी
महावितरण मालवण उपविभाग कार्यालयातील वीज बिल भरणा केंद्र बंद झाल्याने मालवण शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयींविषयी भाजपा मालवणेने पालकमंत्री नितेशजी राणे यांचे लक्ष वेधले असून सदर केंद्र सुरु ठेवण्याच्या सूचना वीज वितरणास देण्यात आल्या असून सोमवार ३ नोव्हेंबरपासून वीज बिल केंद्र सुरु होणार आहे अशी माहिती मालवण भाजप अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली. महावितरण मालवण उपविभाग कार्यालयाच्या आवारात सध्या सुरू असलेले पर्यायी भरणा केंद्राचे ठिकाण चालू होणार असून त्याचबरोर सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था शाखा मालवण (भरड नाका ) S S मोबाईल जवळ (देऊलकर मसालेच्या वर ) , १ ला मजला मालवण याव्यतिरिक्त, ग्राहक खालील डिजिटल माध्यमांचा वापर करून २४/७ केव्हाही आपले वीज बिल भरू शकतात पर्याय क्र. १ - महावितरण मोबाईल ॲप (MSEDCL Mobile App)ॲप डाउनलोड करन ग्राहक क्रमांक (Consumer Number) वापरून नोंदणी करा. बिल पहा आणि त्वरित भरा.यामध्ये मागील बिलांचे तपशील, भरणा पावत्या (Receipts) आणि वीज वापराचा आलेख पाहता येतो पर्याय क्र. २ - महावितरण अधिकृत संकेतस्थळ (Website)संकेतस्थळwww.mahadiscom.inयाद्वारे 'View/Pay Bill' वर क्लिक करा. तुमचा ग्राहक क्रमांक आणि कॅप्चा कोड (Captcha) टाका. बिल तपासा आणि नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे पेमेंट करा. मोठा तपशील पाहण्यासाठी आणि अधिकृत व्यवहार करण्यासाठी हे संकेस्थळ सोपे आहे. पर्याय क्र. ३ - लोकप्रिय ऑनलाइन पेमेंट ॲप्स (उदा. Google Pay, PhonePe, Paytm इ.)*Google Pay (GPay), PhonePe, Paytm, Amazon Pay किंवा कोणताही BHIM UPI ॲप.ॲपमध्ये 'Electricity Bill' किंवा 'MSEDCL/Mahavitaran' निवडा. तुमचा ग्राहक क्रमांक (Consumer Number) टाका. बिलाची रक्कम तपासा आणि UPI/बँक खात्याद्वारे पेमेंट करा. आपण रोज वापरत असलेल्या ॲप्समधून त्वरित पेमेंटची सुविधा. जागेवर तात्काळ पावती मिळते. डिजिटल पेमेंटचा वापर करा आणि सुरक्षित राहा असे आवाहन विष्णू मोंडकर तालुका अध्यक्ष भाजपा मालवण यांनी केले आहे .