2030 च्या वाहन विक्रीत 30 टक्के हिस्सा इलेक्ट्रिक वाहनांचा ?
07:00 AM Jul 22, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : देशामध्ये वर्ष 2030 पर्यंत विक्री होणाऱया नवीन वाहनांमध्ये जवळपास 30 टक्के इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री होणार आहे. असे जलवायू व ऊर्जा शोध संस्थेकडून करण्यात आलेल्या एका संशोधनामधून ही माहिती देण्यात आली आहे.
Advertisement
ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषद (सीईईडब्लू) यांच्या अहवालामध्ये म्हटले आहे, की वर्ष 2050 पर्यंत एकूण विक्री होणाऱया वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची हिस्सेदारी ही वेगाने वाढत जात ती जवळपास 75 टक्के होणार असल्याचा अंदाज आहे.
Advertisement
दुसऱया एका अंदाजानुसार वर्ष 2030 पर्यंत एकूण नवीन दुचाकी वाहनांमधील निम्मी वाहने ही दुचाकी राहणार असल्याची माहिती आहे. यासह तीनचाकी व चारचाकी वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची हिस्सेदारी ही 25 टक्के राहणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे.
Advertisement
Next Article