फेब्रुवारीत इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीमध्ये अल्पशी घट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फेब्रुवारी महिन्यात इलेक्ट्रीक वाहनांची विक्री 139026 इतकी झाली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता वाहनांची विक्री 1.9 टक्के घटली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी ही माहिती दिली आहे.
चारचाकी इलेक्ट्रीक वाहनांची विक्री जवळपास दोनअंकी घटली होती. या सोबत तिचाकी, व्यावसायिक वाहने आणि पॅसेंजर वाहनांची विक्री एकअंकी वाढलेली दिसून आली. टीव्हीएस मोटर्स, अॅथर एनर्जी आणि ओला इलेक्ट्रीक यांची वाहन विक्री घसरणीसह अनुक्रमे 18762, 11807, 8647 इतकी झाली होती. दुसरीकडे बजाज ऑटो कंपनीच्या वाहन विक्रीमध्ये मात्र फेब्रुवारीत वर्षाच्या आधारावर 8 टक्के वाढ दिसून आली.
मागच्या महिन्यात तिचाकी वाहनांच्या विक्रीत 11 टक्के घसरण पहायला मिळाली. एकंदर 53116 इतक्या तिचाकी फेब्रुवारी महिन्यात विकल्या गेल्या. पॅसेंजर वाहनांची विक्री 8968 वर घसरली, जी जानेवारी 2025 मध्ये 11266 इतकी होती. ह्युंडाई मोटार आणि बीएमडब्ल्यु इंडिया यांच्या विक्रीत काहीशी वाढ दिसून आली. व्यावसायिक वाहनांची विक्री मात्र 856 इतकी झाली असून ती जानेवारी महिन्याइतकीच आहे.
भारतामध्ये इलेक्ट्रीक वाहनांप्रती ग्राहकांचा प्रतिसाद वाढायचा असेल तर जास्तीत जास्त चार्जिंग केंद्रे स्थापित केली जायला हवीत. यामध्ये सर्वच प्रकारातील इलेक्ट्रीक वाहनांचा वाटा आगामी काळात वापराच्या दृष्टिकोनातून वाढायला हवा.
दुसऱ्या सहामाहीतली कामगिरी
2024 च्या दुसऱ्या सहामाहीत इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीमध्ये चांगली वाढ दिसून आली. यामध्ये एकट्या ऑक्टोबर महिन्यात 219482 वाहनांची विक्री झाली होती. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात वाहन विक्री अनुक्रमे घसरत 192575, 132302 इतकी राहिली होती.
फेब्रुवारीमधील वाहन विक्री
पॅसेंजर वाहन 8968
दुचाकी 76086
व्यावसायिक वाहने 856
तिचाकी 53116
एकूण विक्री 139026