For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किणये येथे विद्युतखांब कोसळण्याच्या मार्गावर

10:31 AM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
किणये येथे विद्युतखांब कोसळण्याच्या मार्गावर
Advertisement

हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी : नवीन खांब बसविण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर /किणये

किणये गावात पथदीप कोसळण्याच्या मार्गावर आहे. हा खांब बाजुलाच असलेल्या विद्युतभारित तारांवर कोसळण्याची शक्मयता आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. तेव्हा हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी या धोकादायक खांबाची पाहणी करून त्या ठिकाणी नवीन खांब बसविण्यात यावा, अशी मागणी होत आहे. किणये ग्रामपंचायत समोरील स्वीट मार्टच्या बाजूला रस्त्याच्या कडेला विद्युतखांब आहे. चार दिवसांपूर्वी गोव्याहून बेळगावला जाणाऱ्या एका कारगाडीने थेट त्या विद्युत खांबाला जोराची धडक दिली. यामुळे हा खांब मोडलेला आहे. केवळ तारांच्या आधारावर हा खांब सध्या टिकून आहे. मात्र तो कधीही कोसळून पडण्याच्या अवस्थेत आहे. खांब कोसळल्यास किणये गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युतभारित तारांवर खांब कोसळणार आहे. तसेच बाजूला दुकाने आहेत. यामुळे याचा स्थानिकांना अधिक धोका निर्माण झाला आहे.

Advertisement

खांब कोसळून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

गोव्याहून बेळगावकडे जाणाऱ्या कारगाडीने या विद्युतभारित खांबाला जोराची धडक दिली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र खांब मोडलेला आहे. तो कधी पडेल याची शाश्वती नाही. हा खांब पडला तर मोठी दुर्घटना घडणार आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना तीन दिवसांपासून याबाबत माहिती दिली आहे. तरीही त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. खांब पडून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? त्यामुळे हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी त्वरित हा खांब काढून त्या ठिकाणी नवीन खांब बसवण्याची गरज आहे.

-निवृत्ती डुकरे, किणये

Advertisement
Tags :

.