कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इलेक्ट्रीक कार्सच्या विक्रीत जूनमध्ये वाढ

06:41 AM Jul 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जून महिन्यात विक्री 9 हजारावर  : श्रीराम फायनान्सची माहिती

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

इलेक्ट्रीक कार्सची विक्री गेल्या जून महिन्यात चांगली झाली असल्याचे दिसून आले आहे. पण घटत्या मागणीचा फटका मात्र प्रवासी कार्सवर दिसला. श्रीराम फायनान्सच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

महिन्याच्या स्तरावर पाहता इलेक्ट्रीक दुचाकींच्या विक्रीत जूनमध्ये 5 टक्के वाढ दिसली. जूनमध्ये 93,872 दुचाकींची विक्री झाली आहे. यामागच्या म्हणजेच मे महिन्यात हा आकडा 88,986 इतका होता. याचदरम्यान इलेक्ट्रीक कार्सची विक्री जून 2025 मध्ये वाढीसोबत 9804 इतकी राहिली होती. जून 2024 मध्ये पाहता इलेक्ट्रीक कार्स 717 इतक्याच विकल्या गेल्या होत्या. महिन्याच्या आधारावर पाहता कार्सची विक्री नाममात्र 1 टक्का इतकी वाढली आहे. मे 2025 9693 इलेक्ट्रीक कार्स विक्री झाल्या आहेत.

प्रवासी कार्सना नापसंती

पॅसेंजर किंवा प्रवासी कार्सच्या विक्रीबाबत मात्र निराशा दिसली आहे. सध्याची अस्थिर स्थिती यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. इलेक्ट्रीक कार्सप्रती भारतीयांचा कल वाढत असून मागणी आगामी काळात वाढती राहू शकते, असेही तज्ञांनी मत नोंदवले आहे. नव्या मॉडेलचे सादरीकरण ग्राहकांना आकर्षित करत आहे.

पेट्रोलचा खप वाढला

याचदरम्यान जून 2025 मध्ये पेट्रोलचा वापर वाढला आहे. जूनमध्ये 6.4 टक्के वाढीसह 3.51 दशलक्ष टन पेट्रोलचा वापर करण्यात आला आहे. जून 2024 मध्ये 3.30 दशलक्ष टन पेट्रोलचा वापर केला गेला होता. याचप्रमाणे डिझेलचा वापरही सदरील महिन्यात 1.2 टक्के वाढत जून 2025 मध्ये 8.08 दशलक्ष टन इतका झाला आहे. जून 2024 मध्ये 7.98 दशलक्ष टन डिझेलचा वापर केला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article