महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांगलादेशात लवकरच होणार निवडणूक

06:22 AM Nov 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्त नासिर यांनी घेतली शपथ

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

बांगलादेशात नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नासिर उद्दीन आणि चार अन्य आयुक्तांनी स्वत:च्या पदाची रविवारी शपथ घेतली. सरन्यायाधीश सैयद रेफात अहमद यांनी नव्या आयुक्तांना शपथ दिली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाल्याने बांगलादेशात आता लवकरच सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याचे मानले जात आहे. तेथे लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी जोर पकडू लागली आहे.

शेख हसीना यांचे सरकार विद्यार्थी आणि अन्य संघटनांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात उलथवून टाकण्यात आले होते. यानंतर बांगलादेशच्या मागील मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते.

नवे मुख्य आयुक्त नासिर यांनी यापूर्वी सेवक सैन्य अधिकारी अणि कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आहे. तर अन्य चार नवे निवडणूक आयुक्त हे सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश मोहम्मद अनवारुल इस्लाम सरकार, अब्दुर रहमानल मसूद, सेवानिवृत्त संयुक्त सचिव बेगम तहमीदा अहमद आणि सेवानिवृत्त सैन्य ब्रिगेडियर अबुल फजल मोहम्मद सनाउल्लाह आहेत.

बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी 21 नोव्हेंबर रोजी नासिर यांची मुख्य निवडणूक आयुक्त पदावर नियुक्ती केली होती. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे अवामी लीग सरकार हटविण्यात आल्यावर काजी हबीबुल अवाल यांच्या नेतृत्वाखालील आयोगाच्या सदस्यांनी 5 सप्टेंबर रोजी राजीनामा दिला होता.

1972 मध्ये स्वत:च्या स्थापनेपासून निवडणूक आयोगातील पदे कधीच इतक्या काळापर्यंत रिक्त राहिली नव्हती. 29 ऑक्टोबर रोजी बांगलादेशच्या अंतरिम सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश जुबैर रहमान चौधरी यांच्या नेतृत्वत सहा सदस्यीय समितीची स्थापना केली होती. या समितीच्या प्रत्येक सदस्याला निवडणूक आयोगाच्या सदस्यत्वासाठी दोन जणांची नावे सुचविण्यास सांगण्यात आले होते.

माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीसोबत अन्य राजकीय पक्ष मागील आठवड्यापासून देशात लवकरात लवकर निवडणूक करविण्याची मागणी करत आहेत. याचमुळे तेथे निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आमचे सरकार निवडणूक सुधारणांवर निर्णय होताच निवडणुकीचा रोडमॅप जारी करणार असल्याचे बांगलादेशच्या मुख्य सल्लागारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article