निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अतिसंवेदनशील गावांची यादी तयार करा ! पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, क्राईम आढावा बैठक संपन्न
कोल्हापूर प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील अतिसंवेदनशील गावे, मतदान केंद्र, बुथ यांचा आढावा घ्या. तसेच या ठिकाणी बंदोबस्ताचे योग्य नियोजन करा अशा सुचना मंगळवारी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी दिल्या. मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात क्राईम आढावा बैठक पार पडली. आपापल्या हद्दीत दररोज नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करा. अवैध दारू, हत्यारे, अंमली पदार्थ यासह रोख रक्कम वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वच अधिक्रायांनी अलर्ट रहावे. अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन करण्याच्या सुचनाही पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी दिल्या.
बैठकीच्या प्रारंभी महिनाभरात कोल्हापूर जिल्ह्हयातील सर्वच पोलीस ठाण्यात उत्कृष्ठ कामगिरी,डिटेक्शन करण्राया कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. काहींना प्रशस्तीपत्र देण्यात आले. महिनाभरातील गुन्हयांचा आढाव घेण्यात आला. शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक निरीक्षक रविंद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत आदी हजर होते.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत म्हणाले, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घ्या ,बुथ भेटी, रुट मार्चला प्राधान्य द्या. नाकाबंदीचे पॉईट ठरवा, दररोजी एका पॉईंटवर अधिकारी व कर्मचारी नेमून सर्वच प्रकारच्या वाहनांची तपासणी करा. या कालावधीत गोवा बनावटीच्या दारची तस्कारी वाढते ती थांबवण्यासाठी तपासणी नाक्यांवर दिवसा व रात्री गस्त वाढवा.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांना तडीपार करा, स्थानबध्द, प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव तयार करा. फाळकुट दादांची गुंडगिरी पुन्हा डोकं वर काढत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा. सर्वसामान्य नागरीकांना आणि फेरीवाल्यांना कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर तातडीने कारवाई करा. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या. अशा सुचना यावेळी करण्यात आल्या आहेत. तसेच 15 दिवसांवर शिवजयंती आली आहे. याबाबतच्या सुचनाही या बैठकीत देण्यात आल्या.