जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका व्हाव्यात; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णाया कायम ठेवला आहे. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश दिले.
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णायाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निकाल देताना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, "राष्ट्रपती राजवटीत राज्याने घेतलेल्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देता येणार नाही. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. यावर कोणताही आक्षेप असू नये. सर्वोच्च न्यायालय संविधानातील कलम ३७० रद्द करण्याचे आदेश जारी करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार आणि लडाखला वेगळा केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा निर्णय वैध मानते." याबरोबर सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत विधानसभेच्या निवडणुका व्हाव्यात, असे निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत.