For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभेनंतर लगेच तालुका, जिल्हा पंचायतींसाठी निवडणुका

06:48 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभेनंतर लगेच तालुका  जिल्हा पंचायतींसाठी निवडणुका
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

लोकसभा निवडणुकीनंतर लवकरच बेंगळूर महानगरपालिकेच्या निवडणुकांसह जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिली आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित झालेल्या तालुका आणि जिल्हा पंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. म्हैसूरमध्ये शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, बेंगळूर महानगरपालिका, जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतींच्या निवडणुका घेण्यास सरकार तयार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच या निवडणुका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. आधी मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे काम पूर्ण केले जाईल, त्यानंतर निवडणूक आयोग मतदारसंघांचे आरक्षण जाहीर करून निवडणुकीची तारीख निश्चित करेल. बेंगळूर महानगरपालिका, जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांसंबंधी राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात धाव घेतल्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, आम्ही निवडणुका घेण्यास तयार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निश्चित केलेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा, तालुका आणि बेंगळूर महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

हायकमांडवर अवलंबून

Advertisement

विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांना उमेदवारी देण्याबाबत हायकमांड निर्णय घेईल, असे सिद्धरामय्या म्हणाले. यापूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी मला कोलारमधून निवडणूक लढवायची होती. परंतु हायकमांडने  म्हैसूरमधील वरुणा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितले. त्यावेळी वरुणा मतदारसंघाचे आमदार असलेले यतिंद्र सिद्धरामय्या यांनी हा मतदारसंघ माझ्यासाठी सोडून दिला होता. त्यामुळे हायकमांडने यतींद्र यांना विधानपरिषदेचे सदस्य बनविण्याचे आश्वासन दिले होते. अखेर विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय हायकमांड घेईल, असे सिद्धरामय्या म्हणाले.

Advertisement
Tags :

.