निवडणूकीमुळे फटाका विक्रीचा ‘डबलबार’
कोल्हापूर : पावसाने दिलासा दिल्याने, सोमवारपासून शहरातील फटाका विक्री स्टॉल्स सज्ज झाले आहेत. कोरोनानंतर फटाका विक्रीमध्ये सतत वाढ होत आहे. ,पुढील महीन्यात राज्यात विधानसभा निवडणूका होत आहेत. यामुळे दिवाळीबरोबर निवडणूकीसाठी फटाका मागणीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. मागणी बरोबर दरात ही 15 ते 20 टक्क्यांनी फटाके महाग झाले आहेत. 2018 नंतर मोठया आवजाच्या व प्रदूषणमुक्त फटाक्यासह चायना मेड फटाक्यावर सरकारने बंदी आणली आहे. 125 डेसिबल पेक्षा जास्त आवाजाचे फटाके बंद झाले आहेत. निवासी भागात दिवसा 60 तर रात्री 55 डेसिबल, मोकळया मैदानावर दिवसा 80 तर रात्री 70,तर दवाखाना परिसरात 55 पेक्षा कमी डेसिबल असणे आवश्यक आहे. दिल्ली वगळता देशभरात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक फटाके विकले जात आहेत.
सोमवारपासून शहरात आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल ग्राऊंड, राजारामपुरी 9 नंबर शाळेचे ग्राऊंडसह पापाची तिकटी, बागल चौक, खरी कॉर्नर,गांधीनगर,वडगांव आदी ठिकाणी फटाका विक्री जोरात सुरू आहे. कोल्हापूरातून कोकणात ही फटाके पाठवले जात आहे. यंदा राज्यात विधान सभेची निवडणूक असल्याने, दिवाळीपेक्षा दुप्पट फटाक्याची मागणी वाढली आहे. तसेच यंदा 15 ते 20 टक्क्यांनी फटाके दरात वाढ जाली असल्याचे फटाका विक्रेते दर्शन बागवडे यांनी सांगितले. शिवकाशी हे फटाक्याचे केंद्र असून ,अंदाजे 450 पेक्षा अधिक प्रकारचे फटाके बनवले जात आहे. आकाशात प्रदूषणमुक्त उडणाऱ्या फटाक्यांना जास्त मागणी आहे. 240 शॉट असलेला फटाका 35 मिनिटे आकाशात रंगीबेरंगीमध्ये हे फटाके उडत असतात.तर 5 व 3 हजारच्या फटके माळाला मागणी आहे. यंदा लहान मुलासाठी बीडी बॉम्ब व पॉप कॉप हे फटाके बाजारात आले आहेत.