महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नागालँडमध्ये बस उलटून निवडणूक कर्मचारी ठार

06:50 AM Feb 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुरक्षा जवानांना घेऊन जाणाऱया बसला अपघात

Advertisement

@ वृत्तसंस्था / वोखा

Advertisement

विधानसभा निवडणुकीशी संबंधित मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱयांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून रविवारी रात्री येथे रस्ते दुर्घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले. नागालँडमधील वोखा जिह्यातील थिलोंग पुलाजवळ रविवारी ही दुर्घटना घडल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये झारखंड सशस्त्र पोलिसांचे 8 आणि नागालँड सशस्त्र पोलिसांच्या एका जवानाचा समावेश आहे. सोमवारी होणाऱया मतदानासाठी सुरक्षा सज्जतेवर असलेल्या जवानांना वेगवेगळय़ा भागात घेऊन जाणाऱया बसला हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article