महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तीन राज्यातील 15 जागांसाठी आज निवडणूक

06:21 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यसभेसाठी कर्नाटकसह उत्तर प्रदेश, हिमाचलमध्ये रंगतदार स्थिती :  56 पैकी 41 उमेदवार बिनविरोध

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राज्यसभेच्या एकूण 56 जागांपैकी 41 जागा बिनविरोध झाल्या आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि भाजपचे प्रमुख जे. पी. नड्डा यांनी निवडणूक बिनविरोध जिंकली आहे. पण उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे येथे मतदान घ्यावे लागणार आहे. विशेषत: उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणूक रंजक बनली आहे. येथे आठवा उमेदवार उभा करून भाजपने विरोधी गटाला हादरा दिला आहे. भाजपच्या या खेळीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राज्यसभेतील लवकरच रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी गेल्या महिन्यात निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवल्यानंतर 41 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. या 41 नेत्यांमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपाध्यक्ष जे. पी. न•ा, अशोक चव्हाण आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि एल मुऊगन यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत भाजपला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या, त्यानंतर काँग्रेस (6), तृणमूल काँग्रेस (4), वायएसआर काँग्रेस (3), आरजेडी (2), बीजेडी (2) आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बीआरएस आणि जेडीयूला प्रत्येकी एक जागा मिळाली. राज्यसभेच्या उर्वरित 15 जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. या 15 जागा उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमधील आहेत.

हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपकडे जिंकण्यासाठी पुरेसे आमदार नसतानाही त्यांनी एका जागेसाठी अभिषेक मनू सिंघवी (काँग्रेस) यांच्या विरोधात हर्ष महाजन यांना उभे करून निवडणूक रोमांचक बनवली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेत 68 सदस्य आहेत. याचा अर्थ उमेदवाराला जिंकण्यासाठी किमान 35 प्रथम पसंतीच्या मतांची आवश्यकता असेल. राज्यात भाजपचे 25 तर काँग्रेसचे 40 आमदार आहेत.

उत्तर प्रदेशात रस्सीखेच

उत्तर प्रदेशात 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. समाजवादी पक्षाने (एसपी) जया बच्चन, माजी खासदार रामजीलाल सुमन आणि निवृत्त आयएएस अधिकारी आलोक रंजन हे तीन उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान, भाजपने सात ऐवजी आठ उमेदवार उभे करून निवडणूक रंजक बनवली आहे. भाजपने आठवा उमेदवार उभा केला नसता तर उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 10 जागांसाठीही निवडणूक बिनविरोध झाली असती. मात्र, समाजवादी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावल्याचे समजते. समाजवादी पक्षाने आपल्या सर्व आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी केली असली तरी सोमवारी रात्री बोलाविण्यात आलेल्या आमदारांच्या बैठकीत सपाचे आठ आमदार पोहोचले नसल्यामुळे अखिलेश यादव यांची धगधग वाढली आहे. भाजपच्या आठ उमेदवारांमध्ये माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, माजी खासदार चौधरी तेजवीर सिंग, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरपाल मौर्य, माजी राज्यमंत्री संगीता बलवंत, पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, माजी आमदार साधना सिंह, आग्राचे माजी महापौर नवीन जैन आणि स्थानिक उद्योगपती व माजी सपा नेते संजय सेठ यांचा समावेश आहे.

आजच मतमोजणी

उत्तर प्रदेशसह तीनही राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article