महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवडणूक निकाल 2023

05:27 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सत्तापालटाची परंपरा यावेळीही कायम

Advertisement

 गेहलोतांना पाच वर्षांनी खाली खेचले, राजस्थानात भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसचा धुव्वा, अनेक मंत्री पराभूत

Advertisement

ज्यात बहुमतासाठी 100 जागा जिंकणे अहावश्यक होते. राज्यातील 200 जागांपैकी 199 जागांसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. श्रीगंगानगरमधील करणपूर मतदारसंघातील निवडणूक काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. महत्त्वपूर्ण निकालात माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी चौथ्यांदा निवडून येण्यात यश मिळविताना झालरापाटन जागा जिंकली आहे, तर विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना जरी सत्ता गमवावी लागलेली असली, तरी सरदारपुरा मतदारसंघातून ते सहाव्यांदा विजयी झाले आहेत. आता राज्यातील सर्वांत मोठ्या नेत्या असलेल्या वसुंधरा राजे याच पुन्हा मुख्यमंत्री होतील की अन्य कुणी त्या खुर्चीवर आरुढ होईल, याची उत्सुकता आहे.

पाच वर्षांनी सत्ताधारी पक्षाची हकालपट्टी करण्याचा तीन दशके जुन्या इतिहासासाठी ओळखल्या जाणाऱ्या या राज्यात अशोक गेहलोत यांनी सरकारी कल्याणकारी योजनांच्या लोकप्रियतेच्या आधारावर काँग्रेस पक्षाची सत्ता टिकून राहील असा विश्वास बाळगला होता. तर सत्तेवर येण्यासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर भर दिला होता. त्याशिवाय उदयपूरमधील शिंपी कन्हैय्या लाल याची हत्या आणि महिलांसंबंधीच्या गुह्यांसह राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतच्या चिंतेकडे लक्ष वेधत पंतप्रधान मोदींनी सत्ताधारी काँग्रेसवर प्रचारादरम्यान टीकेची झोड उठविली होती.

वसुंधरा राजे वगळता जे इतर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत त्यात विद्यानगरमधून दिया कुमारी, झोतवाडामधून राजवर्धन सिंह राठोड, पिंडवारा अबूमधून समराम, मनोहर ठाणामधून गोविंद प्रसाद, बेहरोरमधून जसवंत सिंह यादव, जामवा रामगढमधून महेंद्र पाल मीना, दक्षिण अजमेरमधून अनिता भदेल आणि रामगंज मंडीतून मदन दिलावर तसेच इतर उमेदवार विजयी झाले आहेत.

काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये अशोक गेहलोत वगळता टोंकमधून सचिन पायलट, कोटा उत्तरमधून शांती धारीवाल, अलवर ग्रामीणमधून टिकाराम जुली आणि हिंडौनमधून अनिता जाटव यांचा समावेश आहे. याशिवाय चोमूमधून शिखा मील बरलिया, किशन पोलमधून अमिन कागझी, आदर्शनगरमधून रफीक खान, बस्सीमधून लक्ष्मण मीना यांनीही विजय मिळवलेला आहे. काँग्रेसचे विधानसभा सभापती सी. पी. जोशी यांच्यासह अनेक मंत्र्यांना पराभवाचा तडाखा मिळालेला आहे. भारत आदिवासी पक्षाचे (बीएपी) उमेदवार राजकुमार रोट आणि थावर चंद यांनी अनुक्रमे चोरासी आणि धारियावाड मतदारसंघातून विजय मिळवला आहे. दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत, तर अन्य पाच उमेदवार आघाडीवर होते.

महत्त्वाचे विजयी उमेदवार...

?सचिन पायलट : काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री टोंक विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या अजितसिंह मेहता यांचा 29,475 मतांनी पराभव केला. पायलट यांना 1 लाख 4 हजार 448 मते, तर मेहता यांना 75 हजार 211 मते मिळाली.

?राजवर्धन सिंह राठोड : भाजपचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री झोटवाडा विधानसभा मतदारसंघात 50,167 मतांनी विजयी झाले आहेत. राठोड यांनी 1 लाख 47 हजार 913 मते मिळवून त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अभिषेक चौधरी यांचा पराभव केला.

?वसुंधरा राजे : भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांनी झालरापाटनमधून विजय मिळवला असून त्यांनी जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रामलाल चौहान यांचा 53 हजार मतांनी पराभव केला.

?अशोक गेहलोत : काँग्रेस नेते आणि राजस्थानच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या महेंद्रसिंह राठोड यांच्यावर 26 हजार मतांनी विजय मिळविला. गेहलोत यांना 96859 मते मिळाली, तर राठोड यांना 70463 मते प्राप्त झाली.

?महंत बालकनाथ : या भाजप नेत्याने त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी इम्रान खान यांचा तिजारा मतदारसंघात 6 हजार 173 मतांनी पराभव केला. बालकनाथ यांना 1 लाख 10 हजार 209, तर खान यांना 1 लाख 4 हजार 36 मते मिळाली.

का हरली काँग्रेस?

?प्रचारादरम्यान, भ्रष्टाचार, महिलांवरील हिंसाचार, भरती परीक्षा पेपर लीक प्रकरणे आणि शेतकरी आत्महत्या यासारख्या मुद्यांचा वापर विरोधी भाजपने प्रभावीरीत्या करून अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला कोंडीत पकडले.

?काँग्रेसने पक्षांतर्गत परिस्थितीचा विचार करता एकत्रिपणे आघाडी उघडलेली असली, तरी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखालील गटांमधील भांडणाचा विपरित परिणाम राजस्थानमधील पक्षाच्या संधीवर झाल्याचे दिसून येते.

?मुख्यमंत्रीपद सांभाळणारे अशोक गेहलोत आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या क्षमतेवर आणि पक्षाने राज्यासाठी दिलेल्या हमींवर पक्षाचा भरवसा होता. मात्र, भरती परीक्षा पेपर लीक घोटाळे आणि महिलांवरील हिंसाचार हे मुख्य मुद्दे बनले.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article