ठाकरे शिवसेनेच्या दोन तालुकाप्रमुखांची निवड
सावंतवाडी । प्रतिनिधी
आगामी नगरपालिका , जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने सावंतवाडी तालुक्यात नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या दृष्टीने व्युहरचना आखली आहे. सावंतवाडी तालुक्यात पूर्व व पश्चिम असे विभाग करण्यात आले असून त्यानुसार दोन तालुका प्रमुखांची निवड करण्यात आली आहेत. पूर्व विभागाच्या तालुकाप्रमुख पदी माजी पंचायत समिती सदस्य तथा उपतालुका संघटक पदी कलंबिस्त येथील रमेश दाजी सावंत आणि पश्चिम विभागाच्या तालुकाप्रमुख पदी राजू शेटकर या दोन्हीही निष्ठावंत शिवसैनिकांची वर्णी लावण्यात आली आहे. तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने सावंतवाडी तालुक्यात दोन विभाग केले आहेत. त्यानुसार दोन तालुकाप्रमुख नियुक्त केले आहेत. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. माजी खासदार विनायक राऊत , संपर्कमंत्री अरुण दुधवडकर , जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले .