स्थायी समिती अध्यक्षपदांची निवडणूक अविरोध
प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडीचा मार्ग मोकळा
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
महानगरपालिकेच्या चार स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सोमवार दि. 17 रोजी निवडणूक पार पडली. अध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने चारही अध्यक्षांची अविरोध निवड करण्यात आली.
सोमवारी दुपारी 3.30 वाजता महापालिकेच्या सभागृहात महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यावेळी दक्षिण मतदारसंघातून तीन तर उत्तर मतदारसंघातून एका अध्यक्षाची निवड करण्यात आली. कर स्थायी समिती अध्यक्षपदी रमेश श्रीकांत मैल्यागोळ, आरोग्य स्थायी समिती अध्यक्षपदी राजू भातकांडे, बांधकाम स्थायी समिती अध्यक्षपदी श्रीशैल सोमशेखर नाकाडी तर लेखा स्थायी समिती अध्यक्षपदी सारिका पाटील यांची अविरोध निवड करण्यात आली.
यावेळी उपमहापौर हणमंत कोंगाली, मनपा आयुक्त कार्तिक एम., कौन्सिल सेक्रेटरी रमेश बडीगेर यांच्यासह चारही स्थायी समित्यांचे सदस्य उपस्थित होते. नूतन अध्यक्षांचे महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
नूतन स्थायी समिती अध्यक्ष व सदस्य
कर स्थायी समिती - अध्यक्ष - रमेश मैल्यागोळ, सदस्य - नंदू मिरजकर, शंकर पाटील, रविराज सांबरेकर, दीपाली टोपगी, मोदीनसाब मतवाले, बसवराज मारुती मोदगेकर.
आरोग्य स्थायी समिती - अध्यक्ष - राजू भातकांडे, सदस्य - शैलेश कांबळे, रुपा चिक्कलदिन्नी, नेत्रावती भागवत, प्रिया सातगौडा, शामोबिन सलीमखान पठाण, शाहीदखान पठाण.
बांधकाम स्थायी समिती- अध्यक्ष - श्रेयस नाकाडी, सदस्य - जयंत जाधव, सविता पाटील, गिरीश धोंगडी, अभिजीत जवळकर, लक्ष्मी लोकरी, खुर्शद मुल्ला.
लेखा स्थायी समिती - अध्यक्ष - सारिका पाटील, सदस्य - रेश्मा कामकर, माधवी राघोचे, जयतीर्थ सवदत्ती, नितीन जाधव, शिवाजी मंडोळकर, अफरोज मुल्ला.