For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

मुख्याध्यापक संघाचा फॉर्मुला ठरला; 23 जागांपैकी दादा लाड गटाला 12 तर बाबा पाटील गटाला 11 जागा

06:07 PM Mar 28, 2024 IST | Abhijeet Khandekar
मुख्याध्यापक संघाचा फॉर्मुला ठरला  23 जागांपैकी दादा लाड गटाला 12 तर बाबा पाटील गटाला 11 जागा
Election

निवडणूकीसाठी 136 उमेदवारी अर्ज दाखल : 30 व 31 मार्चला अर्ज माघार; निवडणूक बिनविरोध होणार

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची निवडणूक 7 एप्रिला रोजी होणार आहे. गुरूवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 136 उमेदवारी अर्ज भरले आहेत. असे असले तरी आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत बिनविरोध निवडणूकीचा निर्णय झाला आहे. 23 जागांपैकी दादा लाड गटाला 12 तर बाबा पाटील गटाला 11 जागा देण्याचा फॉर्मुला ठरला आहे. त्यामुळे मुख्याध्यापक संघाची निवडणुक बिनविरोध होणार असल्याचे दादा लाड आणि बाबा पाटील या दोन्ही गटांच्या नेत्यांनी सांगितले आहे.

मुख्याध्यापक संघाच्या विविध पदाच्या निवडणुकीसाठी 313 उमेदवारांनी अर्ज खरेदी केले होते. पहिल्या दिवशी एकही अर्ज भरला नव्हता, परंतू गुरूवारी 136 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत आसगावकर यांनी मुख्याध्यापक संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही गटांनी आपआपले प्रस्ताव तयार केले होते. हे प्रस्ताव शिक्षक नेत्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यासमोर मांडले. यावर चर्चा होवून दादा लाड गटाला 12 तर बाबा पाटील गटाला 11 जागा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. परंतू 30 ते 31 मार्चला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल, असे मुख्याध्यापकांचे मत आहे.

Advertisement

पदाधिकारी 6 पदे
एकूण             बाबा पाटील गट       दादा लाड गट
6             3
संचालक 17 पदे
एकूण             बाबा पाटील गट       दादा लाड गट
17                 8                                  9
एकूण जागा
23               11                               12

Advertisement

मुख्याध्यापक संघासाठी उमेदवारांनी पदनिहाय्य भरलेले अर्ज
चेअरमन 6, व्हाईस चेअरमन 15, सेक्रेटरी 11, जॉईंट सेक्रेटरी 12, ट्रेझरर 12, संचालक मंडळासाठी 80, असे एकूण 136 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. निवडणूक बिनविरोध होणार असली तरी दोन्ही गटांकडून अर्ज भरले आहेत. त्यामुळे सर्वज अर्ज माघार घेणार की निवडणूक लढवली जाणार याकडे शिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आमदार सतेज पाटील यांनी दिलेला फॉर्मुला मान्य
मुख्याध्यापक संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत आसगावकर यांनी दिलेला फॉर्मुला मान्य आहे. अशी प्रतिक्रिया सुरेश संकपाळ व दत्ता पाटील यांनी दिली आहे. यामध्ये दादा लाड आणि बाबा पाटील यांची भूमिका अतिशय महत्वाची मानली जाते.

Advertisement
×

.