For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डब्ल्यूएफआयच्या चेअरमनपदी नरसिंग यादवची निवड

06:06 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
डब्ल्यूएफआयच्या चेअरमनपदी नरसिंग यादवची निवड
Advertisement

वृत्तसंस्था/ वाराणसी

Advertisement

राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णविजेता मल्ल नरसिंग पंचम यादवची भारतीय कुस्ती फेडरेशन अॅथलेटिक्स कमिशनच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. जागतिक कुस्ती संघटनेच्या आदेशानुसात ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

सात जागांसाठी एकूण 8 उमेदवार रिंगणात होते. बॅलट पेपरद्वारे घेण्यात आलेल्या मतदानानंतर सात जणांची निवड करण्यात आली. या सर्वांनी कमिशनच्या चेअरमनपदी नरसिंग यादवची निवड केली. निवडून आलेल्या अन्य उमेदवारांत साहिल, स्मिथा एएस, भारती भांघेइ, खुशबू एस पवार, निक्की व श्वेता दुबे यांचा समावेश आहे.

Advertisement

नरसिंग यादवने 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. मात्र स्पर्धेआधी घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने त्याच्यावर राष्ट्रीय उत्तेजकविरोधी एजन्सीने (नाडा) चार वर्षांची बंदी घातली होती. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादानेही त्याची बंदी कायम ठेवली. पण त्यांचा हा निर्णय रिओ ऑलिम्पिकमधील नरसिंगच्या पहिल्या लढतीआधीच मिळाल्याने नरसिंगला रिओ ऑलिम्पिकमधून बाहेर पडावे लागले होते. जुलै 2020 मध्ये त्याचा बंदीचा कालावधी संपला होता.

Advertisement
Tags :

.