निवडणूक आयोगाचा 6-7 रोजी केरळ दौरा
06:43 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी 6 आणि 7 मार्च रोजी केरळ विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. या दौऱ्यात सर्व जिल्ह्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून इत्यंभूत माहिती मिळविली जाईल. तसेच मतदानाच्या संभाव्य तारखांचा विचारही केला जाणार आहे. यावर्षी केरळ, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. आयोगाने आधीच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीला भेट देऊन आढावा घेतलेला आहे. या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
Advertisement
Advertisement