For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आतिशी यांना निवडणूक आयोगाची नोटीस

06:39 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
आतिशी यांना निवडणूक आयोगाची नोटीस
Advertisement

भाजपवर ऑफर दिल्याचा केला होता आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

निवडणूक आयोगाने दिल्लीतील मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांना नोटीस बजावली आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याशी संपर्क साधण्यात आला होता असा दावा आतिशी यांनी केला होता. याचप्रकरणी त्यांना  आयोगाने नोटीस जारी केली आहे.

Advertisement

भाजपमध्ये सामील होण्याच्या ऑफर संबंधीच्या दाव्याच्या समर्थनार्थ तथ्यांसोबत शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जबाब देण्याचा निर्देश आयोगाने आतिशी यांना दिला आहे. अलिकडेच भाजपने देखील याप्रकरणी आतिशी यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती.

आतिशी यांनी आरोप त्वरित मागे घ्यावेत तसेच स्वत:ची माफी टीव्ही आणि सोशल मीडियावरून प्रसारित करावी. अन्यथा तुमच्या विरोधात दिवाणी तसेच गुन्हेगारी कार्यवाही सुरू करण्यात येईल असे भाजपने आतिशी यांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद आहे.

एका निकटवर्तीच्या माध्यमातून आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर मिळाल्याचा दावा आतिशी यांनी मंगळवारी केला होता. तसेच भाजपमध्ये प्रवेश न केल्यास आगामी काळात अटक करण्यात येईल अशी धमकी मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते. सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चड्ढा यांना ईडीकडून अटक करण्यात येईल असेही आतिशी यांनी म्हटले होते. आतिशी यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देत भाजपने ऑफर देणाऱ्या व्यक्तीचे नाव जाहीर करण्याचे आव्हान दिले होते.

Advertisement
Tags :

.