For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Election 2025: निवडणूक यंत्रणा लागली कामाला, EVM मशिनची पडताळणी शेवटच्या टप्प्यात

04:20 PM Jun 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
election 2025  निवडणूक यंत्रणा लागली कामाला  evm मशिनची पडताळणी शेवटच्या टप्प्यात
Advertisement

राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.

Advertisement

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुकीची अखेर प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. १९ ड वर्ग महापालिकेची प्रभाग रचना चार सदस्यीय होणार असल्याचे आदेश राज्यशासनाने नुकतेच दिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानाचीही निवडणुकीसाठीची यंत्रणा कामाला लागली आहे. ईव्हीएम मशिनची पडताळणी सुरू केली आहे.

दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार असून राज्य निवडणूक आयोगाला ईव्हीएम संदर्भातील अहवाल दिला जाणार आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीची बिगूल बाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.

Advertisement

पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका यांच्यासाठी गट, गण आणि प्रभाग रचनेसाठी लोकसंख्येची माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात नव्याने झालेल्या ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका, त्यानुसार त्यात समाविष्ट झालेली लोकसंख्या, त्यानुसार ग्रामीण भागातील लोकसंख्या या माहितीच्या आधारे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी गट आणि गण (मतदारसंघ), तर नगरपालिका व महापालिकेसाठी प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक ईव्हीएमची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. ईव्हीएम तहसील कार्यालयस्तरावर सुरक्षित आणि बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. या सर्व ईव्हीएमच्या पडताळणीचे काम सुरू आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल. मतदारसंघ निश्चित झाल्यानंतर तालुकानिहाय आवश्यक असणारी ईव्हीएम आहेत की नाहीत, हे स्पष्ट होईल.

कमी असलेल्या ठिकाणी बहुप्रभागास आवश्यक असणारी मशिन उपलब्ध जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकेसाठी बहुप्रभाग तसेच गट आणि गणासाठी एकत्र मतदान करायचे असते. त्यामुळे एकापेक्षा जादा मतपत्रिका जोडण्याची सुविधा असलेली ईव्हीएम बापरली जातात.

जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बापरण्यात येणारी ईव्हीएम आहेत. यापैकी किती ईव्हीएम नादुरुस्त असून किती सुस्थितीत आहेत याची तपासणी सुरू आहे. आवश्यक ईव्हीएम दिली जातील, तर जादा असलेल्या ठिकाणची ईव्हीएम अन्य ठिकाणी वापरली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.