For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता जारी

06:58 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता जारी
Advertisement

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती

Advertisement

बेळगाव/प्रतिनिधी

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे तात्काळ निवडणुकीची आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. पारदर्शक आणि न्यायसंमत निवडणूक घेण्यास अनुकूल व्हावे, यासाठी आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी दि. 7 मे रोजी मतदान घेतले जाणार आहे.  दि. 4 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी दि. 16 मार्चपासून आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. याचे सर्वांनी पालन करावे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

निवडणुकीची अधिसूचना दि. 12 एप्रिलपासून जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ, दि. 19 एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस, दि. 20 एप्रिल नामपत्र छाननी, दि. 22 एप्रिल अर्ज माघारीसाठी शेवटचा दिवस आहे. दि. 7 मे रोजी मतदान करणे, दि. 4 जून मतमोजणी, दि. 6 जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बेळगाव, चिकोडी या दोन लोकसभा मतदारसंघांसह व कारवार लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खानापूर, कित्तूर हा भाग आपल्या व्याप्तीत येतो. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. उमेदवारांकडून जाहिरात करून प्रसिद्धी करताना सोशल मीडियाने परवानगी घेणे सक्तीचे आहे. आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये 64 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. महसूल, पोलीस व निवडणूक विभागाचे अधिकारी या ठिकाणी कार्यरत असणार आहेत. गैरकारभार रोखण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 40 लाख 62 हजार 210 मतदार

चिकोडी लोकसभा मतदारसंघात 17 लाख 41 हजार 758 मतदार आहेत. यामध्ये 8 लाख 75 हजार 953 पुरुष व 8 लाख 65 हजार 731 महिला मतदार आहेत. 74 तृतीयपंथी मतदार आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघात 1904099 मतदार आहेत. यामध्ये 9 लाख 48 हजार 282 पुरुष, 9 लाख 55 हजार 725 महिला मतदार आहेत. तर 92 तृतीयपंथी मतदार आहेत. कारवार लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खानापूर व कित्तूर तालुक्यात 4 लाख 16 हजार 353 मतदार असून यामध्ये 2 लाख 11 हजार 496 पुरुष, 2 लाख 4848 महिला मतदार असून 9 तृतीयपंथी मतदार आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 4062210 मतदार आहेत. 20 लाख 35 हजार 731 पुरुष मतदार, 20 लाख 26 हजार 304 महिला मतदार तर 175 तृतीयपंथी मतदार आहेत.

जिल्ह्यात 56068 दिव्यांग मतदार आहेत. यामध्ये पुरुष 33669, महिला 22393, तृतीयपंथी 6 मतदार आहेत.

जिल्ह्यात 80 वर्षांवरील 45000 मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष 18669, महिला 26331 मतदार आहेत.

जिल्ह्यात 108596 युवा मतदार आहेत. यामध्ये 59624 पुरुष, 48957 महिला मतदार आहेत.

जिल्ह्यामध्ये 4524 मतदान केंद्रे आहेत. चिकोडी लोकसभा मतदारसंघात 1896, बेळगाव लोकसभा मतदारसंघात 2086,

खानापूर व कित्तूर तालुक्यात 542 अशी मतदान केंद्रे आहेत.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यामध्ये मतदान कमी झालेल्या यापूर्वीच्या निवडणुकीचा आढावा घेऊन जागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

Advertisement
Tags :

.