For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मातोंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे आनंद परब

02:58 PM Nov 24, 2023 IST | अनुजा कुडतरकर
मातोंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे आनंद परब
Advertisement

मातोंड-

Advertisement

बिनविरोध झाली निवड

मातोंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजप पुरस्कृत पॅनलचे आनंद रामचंद्र परब यांची बिनविरोध निवड झाली आहे. मातोंड ग्रामपंचायत कार्यालय येथे आज शुक्रवारी घेण्यात आलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आनंद परब यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून सखाराम सूर्याजी सावंत व सुनील चव्हाण यांनी काम पाहिले.भाजप पुरस्कृत पॅनेलच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. मयुरी वडाचेपाटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. सुजाता सावंत, सौ. किशोरी परब, सौ. वैभवी परब, कु. किरण मातोंडकर, राहुल प्रभू आदी यावेळी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, वेंगुर्ले खरेदी विक्री संघांचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, कमलेश गावडे, जगदीश परब, किशोर परब, पत्रकार रविकिरण परब, हर्षल परब, चिन्मय परब, रमेश परब, महेंद्र मातोंडकर, महेश वडाचेपाटकर, सुधीर मातोंडकर, गायेश परब, शेखर परब, सुधाकर परब, रावजी परब, नंदकिशोर घाडी, ताता मेस्त्री, शासकीय ठेकेदार संजू परब, नंदू परब, विकास वैद्य, ग्रामपंचायत कर्मचारी अरुण रेडकर, चंद्रकांत भगत, पूजा वराडकर-परब, दिगंबर मातोंडकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.