महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जगदीश शेट्टर यांना 2 लाखांहून अधिक मतांनी निवडून आणा

10:57 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे आवाहन

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीमध्ये बेळगाव लोकसभा मतदार संघातून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना 2 लाखांहून अधिक मतांनी निवडून आणा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले. शहरामध्ये भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रसार रॅलीदरम्यान ते बोलत होते. भाजपतर्फे बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे आज बेळगावात आगमन झाले. त्या दरम्यान भाजपकडून त्यांची मोठ्या प्रमाणात समर्थकांसह दुचाकी रॅली काढून स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, भाजप नेते शंकरगौडा पाटील, माजी आमदार अनिल बेनके, विधान परिषद सदस्य रविकुमार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. चन्नम्मा चौकामध्ये कित्तूर राणी चन्नम्मा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते पाहिल्यास जगदीश शेट्टर यांचा विजय निश्चित आहे. मिळालेला प्रतिसाद पाहिल्यास 2 लाखांहून अधिक मतांनी त्यांना निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जगदीश शेट्टर म्हणाले, रॅलीमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते पाहिल्यास पुढील विजयाची ही नांदी आहे. लाखांहून अधिक मते घेऊन निवडून येणार, याचा आपल्याला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला निवडून आणणे आवश्यक आहे. गेल्या दहा वर्षांपासून देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे रक्षण करून जगामध्ये देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article