For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नरतवडे येथे वृध्द महिलेचा शेतात दगडाने ठेचुन खुन; खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट

07:19 PM Apr 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
नरतवडे येथे वृध्द महिलेचा शेतात दगडाने ठेचुन खुन  खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट
Nartawade Crime
Advertisement

यात्रेचा पाळक असल्याने शेतशिवारात सन्नाटा

सरवडे प्रतिनिधी

नरतवडे (ता.राधानगरी) येथे श्रीमती आक्काताई केशव रामाणे (वय ६५)या वृध्दे महिलेचा शेतात अमानुषपणे दगडाने ठेचून खुन करण्यात आला आहे. मयत महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गुंड गायब तर कानातील कर्णफुले तशीच आहेत. गुन्ह्याची नोंद मुलगा बाळासो केशव रामाणे यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात केली आहे.खुनाचे कारण अस्पष्ट असल्याने पोलीस विविध अंगाने शोध घेत आहेत.

Advertisement

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नरतवडे येथील आक्काताई रामाणे या डोंगरालगतच्या टेंबुर नावाच्या शेतात ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या.दुपारी ३ च्या दरम्यान त्यांचा मुलगा बाळासो रामाने आईला बघण्यासाठी गेला असता त्यांना ऊसाच्या सरीत आई छिन्नविच्छिन्न व दगडाने ठेचलेल्या अवस्थेत दिसली.ही घटना त्यांनी गावचे पोलीस पाटील व राधानगरी पोलीस ठाण्यात कळविली.

घटनास्थळी पोलीस फौजफाटा पोहचताच त्यांनी विविध कारणांच्या अनुषंगाने तपास सुरू केला.नरतवडे येथील जोतिर्लिंग चैत्र असल्याने गावचा पाळक पाळला असल्याने शेतशिवार सुनसान होता. याची संशयित आरोपीला माहिती असणार याचाच त्याने फायदा घेतला असणार असा प्राथमिक अंदाज घेतला. या खुनाच्या घटनेची माहिती परिसरात वार्यासारखी पसरल्यांने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.घटनास्थळाचा पोलीसांनी रीतसर पंचनामा करुन मृतदेह सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या मागे मागे मुलगा, सुन,नातु असा परिवार आहे. पुढील तपास पीएसआय महेश घिर्डीकर, हवालदार क्रुष्णात यादव ,शुभांगी जठार, क्रुष्णात खामकर, दिगंबर बसरकर,किरण पाटील, रघुनाथ पोवार करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.