घरात घुसून अज्ञात चोरट्यांकडून वृद्धेचा खून
07:08 PM Nov 10, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सिंधुदुर्गात खळबळ ; कट्टा खालची गुरामवाडी येथील घटना
Advertisement
कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यानी रोहिणी रमेश गुराम (वय 65) या वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्लेखोर चोरटे घटना स्थळावरून पसार झाले.दरम्यान, गंभीररित्या जखमी अवस्थेतील त्या महिलेला शेजारी व नातेवाईक यांनी ग्रामीण रुग्णालय पेंडुर कट्टा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरु आहे. मात्र,हल्लेखोर चोरट्याचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घेतली आहे.
Advertisement
Advertisement