महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गॅस गळतीमुळे भाजलेल्या वृद्धेचा मृत्यू

06:19 AM Dec 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून भाजून गंभीर जखमी झालेल्या मुजावर गल्ली येथील एका वृद्धेचा शनिवारी खासगी इस्पितळात मृत्यू झाला. आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.

Advertisement

लक्ष्मी परशराम हुंदरे (वय 66, रा. मुजावर गल्ली) असे वृद्धेचे नाव आहे. घरात पती, पत्नी दोघेच राहत होते. गेल्या शनिवार दि. 23 रोजी पती कामावर गेले होते. त्यावेळी पाणी तापविण्यासाठी या वृद्धेने गॅस सुरू केला. मात्र, ते पेटले नाही.

त्यानंतर घराला कुलूप लावून त्या बाजारात जाऊन आल्या. अजून पाणी का तापले नाही, म्हणून गॅस पेटविताना आगीचा भडका उडाला. या घटनेत लक्ष्मी भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता शनिवारी या वृद्धेचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सोमवार दि. 1 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी येथे रक्षाविसर्जन होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article