कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुलीवर अत्याचार नराधम वृद्धास २० वर्षे सक्त मजुरी

05:55 PM Mar 08, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Advertisement

कोल्हापूर

Advertisement

अल्पवयीन गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम वृद्धास जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 पी. एफ. सय्यद यांनी दोषी ठरवत 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. दादू नारायण जाधव (वय 70 रा. भादोले ता. हातकणंगले) असे आरोपीचे नांव आहे. 29 ऑगस्ट 2019 रोजी ही हदयद्रावक घटना घडली होती. सरकारी वकील म्हणून प्रतिभा जाधव यांनी काम पाहिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी दादू जाधव आणि पीडीत अल्पवयीन मुलगी एकाच गल्लीमध्ये राहतात. 29 ऑगस्ट रोजी पिडीता चुलत बहिणीसोबत घराच्या दारामध्ये खेळत होती. यावेळी आरोपी दादू जाधव याने पिडीत मुलगीस हातास धरुन आपल्या घरी नेले. यानंतर जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. भेदरलेल्या अवस्थेत पिडीतनेने घडलेली घटना बहिण आणि आईला सांगितली. त्यानंतर पिडीतेच्या नातेवाईकांनी यादवला याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन अरेरावी केली होती. या प्रकरणी वडगांव पोलिस ठाण्यात दादू जाधव याच्यावर भारतीय दंड संहिता कायदा कलम 376 सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा कलम 4, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर दादू जाधवला नागरीकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. दादू जाधव याला अटक करुन याबाबतचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 पी. एफ. सय्यद यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. या प्रकरणात 13 साक्षीदारांची तपासणी झाली. फिर्यादी, पीडीत मुलगी आणि अन्य साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. दरम्यान जाधव यांनी केलेला युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य मानून आरोपीला गुह्यात दोषी ठरवून 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजारांचा दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तपासात वडगाव पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शरयू देशमुख यांचे सहकार्य लाभले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article