एस. टी. बसच्या चाकाखाली सापडून वृद्ध जागीच ठार
04:47 PM Jan 21, 2025 IST | Radhika Patil
Advertisement
लोणंद :
Advertisement
लोणंद गावच्या हद्दीत बसस्थानकासमोर एस. टी. बसच्या चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात सोपान महादेव रिटे (वय 75, रा. तरडफ, ता. फलटण) या वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलीस स्टेशन येथे करण्याचे चालले होते.
याबाबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, लोणंद गावच्या हद्दीत सायंकाळी सातच्या सुमारास बसस्थानकासमोर सोपान महादेव रिटे हे चालले असताना बसस्थानकातून बाहेर आलेली निरा -सातारा क्र-एम एच -07 सी- 7098 ही बस सातारा बाजूकडे जात असताना महादेव रिटे यांचा बसच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते.
Advertisement
Advertisement