For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॅसचा भडका उडून वृद्ध दाम्पत्य जखमी

06:55 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
गॅसचा भडका उडून वृद्ध दाम्पत्य जखमी
Advertisement

सुळगा (हिंडलगा) येथील घटना

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

शंकर गल्ली, सुळगा (हिंडलगा) येथे सिलिंडरमधून गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडून वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले. शनिवारी पहाटे ही घटना घडली असून जखमी दाम्पत्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.

Advertisement

कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील (वय 66), त्यांची पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील (वय 61) अशी जखमींची नावे आहेत. सुरुवातीला त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे. या घटनेत फर्निचर व गृहपयोगी वस्तूंचेही नुकसान झाले आहे.

दुमजली घरात कल्लाप्पा व सुमन हे दाम्पत्य खाली राहतात. वरच्या मजल्यावर मुलगा व सून राहते. मुलगा आजारी असल्यामुळे कल्लाप्पा यांची सून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होती. त्यांचा मुलगा वरच्या मजल्यावर झोपला होता. पहाटे आवाज आला म्हणून मुलगा खाली उतरला त्यावेळी आगीचा भडका उडाला होता.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेग्युलेटरमधून गॅसची गळती झाली होती. पहाटे गॅसचा वास येत होता. त्यावेळी लाईट पेटवताच अचानक भडका उडाला. या घटनेत वृद्ध दाम्पत्य भाजून गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.