For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विसर्जनासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी

08:01 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
विसर्जनासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी
Advertisement

गॅलरी तसेच टेहळणी टॉवरची उभारणी  

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. बेळगाव महानगरपालिका, पोलीस प्रशासन व हेस्कॉमच्या संयुक्त विद्यमाने विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गणेशभक्तांना विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेता यावा, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

Advertisement

बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक काढली जाते. लाखोंच्या संख्येने गणेशभक्त विसर्जन मिरवणुकीत एकत्र येतात. गणेशभक्तांना ही मिरवणूक पाहता यावी, यासाठी मनपाच्यावतीने धर्मवीर संभाजी चौकात गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी बसून नागरिकांना ही मिरवणूक पाहता येणार आहे. तसेच गॅलरीमुळे इतर ठिकाणी होणारी गर्दीही टाळता येणार आहे.

पोलीस प्रशासनाच्यावतीने विसर्जन मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी टेहळणीसाठी टॉवर उभे केले आहेत. विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच विविध माध्यमांनी मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी धर्मवीर संभाजी चौकात मंडप उभारणी केली आहे.

बेळगाव शहरासह उपनगरांमधूनही शेकडो गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. त्यादृष्टीने विसर्जन मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

वाहने लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

कपिलेश्वर विसर्जन तलाव तसेच जक्कीनहोंड येथे खुल्या जाग्यावर वाहने लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कपिलेश्वर विसर्जन तलावावर देखील टेहळणीसाठी टॉवर उभारणी करण्यात आली असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंडप उभारणी करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात होणार असल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.