For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओटवणे येथील एकनाथ गावकर यांचे निधन

04:43 PM Apr 24, 2026 IST | अनुजा कुडतरकर
ओटवणे येथील एकनाथ गावकर यांचे निधन
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

Advertisement

ओटवणे येथील श्री सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानचे मानकरी एकनाथ अंकुश गावकर (५७) यांचे आज शुक्रवारी सकाळी गोवा बांबोळी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. गावच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. बुधवारी रात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर सुरुवातीला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव गोवा येथून ओटवणे गावात आणल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत गावकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील प्रकाश गावकर, मुंबईस्थित संदीप गावकर, गडिंग्लज येथील दीपक गावकर यांचे ते भाऊ तर प्रथमेश गावकर आणि प्रमोद गावकर यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, बहिणी, भावजय, पुतणे, भावोजी, भाचे असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.