33 कोटी रुपयांमध्ये आईनस्टाइन यांच्या पत्राची विक्री
इशारायुक्त होते पत्र
अल्बर्ट आईनस्टाइन यांच्या कार्यामुळे जग आजही त्यांचे ऋणी आहे. लोक त्यांना केवळ महान वैज्ञानिकाच्या स्वरुपात मानत नाहीत, तर मानवतेबद्दल त्यांच्या योगदानासाठीही त्यांचे स्मरण करतात. अशा स्थितीत त्यांच्याशी संबंधित प्रत्येक वस्तू मूल्यवान ही असणारच.
अलिकडेच त्यांचे एक ऐतिहासिक पत्र लिलावात विकले गेले आहे. या पत्रावर आईनस्टाइन यांची स्वाक्षरी होती. हे पत्र 3.9 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 32.7 कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहे. हे पत्र 1939 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांना लिहिले गेले होते. या पत्रात आईनस्टान यांनी अण्वस्त्रांच्या शक्यतेविषयी इशारा दिला होता. अमेरिकेला यावर अध्ययन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. या पत्राने दुसऱ्या महायुद्धादरम्यान अण्वस्त्रांच्या निर्मितीचा मार्ग मोकळा केला होता.
या पत्रात आईनस्टाइन यांनी एक भविष्यवाणी केली होती. त्यांची ही भविष्यवाणी अण्वस्त्रासंबंधी होती. भविष्यात अण्वस्त्र जगासाठी किती धोकादायक ठरू शकतात हे आईनस्टाइन यांनी या पत्रात नमूद केले होते.
इतिहास बदलणारा इशारा
हे पत्र न्यूयॉर्कच्या फ्रँकलिन डी रुझवेल्ट लायब्रेरीयच संग्रहाचा हिस्सा आहे. यात आईनस्टाइन यांनी जर्मनीकडून अण्वस्त्र निर्मितीचे काम केले जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. युरेनियमला नव्या आणि महत्त्वपूर्ण ऊर्जास्रोतांमध्ये बदलले जाऊ शकते. या ऊर्जेचा वापर अत्यंत शक्तिशाली बॉम्ब तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो असे त्यांनी म्हटले होते. या पत्राने अमेरिकेच्या प्रशासनाला आण्विक विखंडनावर स्वत:चे संशोधन वेगवान करण्यासाठी तयार केले, याचा निष्कर्ष म्हणून मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरू झाला. याच प्रोजेक्टने जगाला अण्वस्त्रs दिली. आईनस्टाइन यांनी अमेरिकन आण्विक कार्यक्रम पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, नंतर त्यांनी याला स्वत:ची सर्वात मोठी चूक संबोधिले होते.