For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेनिटोसह आठ जणांना न्यायालयीन कोठडी

01:05 PM Sep 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
जेनिटोसह आठ जणांना न्यायालयीन कोठडी
Advertisement

रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी न्यायालयात सुनावणी : हल्ला प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे

Advertisement

पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणी अटकेत असलेल्या कुख्यात गुंड जेनिटो कार्दोझसह आठ संशयितांना पणजी प्रथमवर्ग न्यायालयाने शुक्रवारी  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, गुह्यात वापरलेले वाहन, मांडवी नदीत फेकण्यात आलेला मोबाईल अद्याप जप्त करण्यात आलेले नाहीत. तसेच घटनेवेळी साक्षीदार  असलेले सोयरू वेळीप यांना मध्ये न पडण्याची धमकी देऊन दाखवण्यात आलेला सुरा प्राप्त झालेला नाही. पुढील तपास सुरू ठेवण्यासाठी कोठडी वाढवणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद पोलिसांच्या वकिलांनी केला. जेनिटोच्या वकिलांनी कोठडी वाढवण्यास जोरदार आक्षेप घेतला.

केवळ गुह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल फोन हस्तगत करण्यासाठी पोलिसांना आणखी कोठडी नको, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यावर केवळ साहित्य व वाहन जप्त करण्याच्या कारणाखाली आणखीन पुढे कोठडी मिळणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट बजावले. मात्र, या बाबतीत नवीन माहिती हाती लागल्यास कोठडी वाढवण्याबद्दल विचार करण्याचे न्यायालयाने सांगितले. जेनिटो कार्दोझ (वय 36) याच्यासह अँथनी नादार (31), फ्रान्सिस नादार (28), मिंगेल आरावजो (24), मनीष हडफडकर (24), सुरेश नाईक (31), फ्रांको डिकॉस्टा आणि साईराज गोवेकर (28) अशी न्यायालयीन कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या चौकशीत या संशयितांनी जेनिटोच्या सांगण्यावरूनच रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला केल्याचे मान्य केले होते.

Advertisement

बॉक्स: आरोपींना होणार तडीपारीची शिक्षा 

या दरम्यान, पोलिसांनी या आठ जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासोबतच, या सर्वांना तडीपार करण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात आली असून, पोलिसांनी या संदर्भात दोन्ही  जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून पुढील कार्यवाही करण्याची शिफारस केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रामा काणकोणकर यांचा अबोला

रामा काणकोणकर पोलिसांना जबानी द्यायला तंदुऊस्त असतानाही पोलिसांना जबानी देण्यास नाकारत आहे. त्यामुळे या हल्ला प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. हल्ला झाल्यानंतर काणकोणकर यांना गोमेकॉत उपचारासाठी भरती करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करून तिसऱ्या दिवशी रामा काणकोणकर तंदुऊस्त असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काणकोणकर यांची जबानी नोंद करण्यासाठी पोलिस दर दिवशी  गोमेकॉत जात आहेत. मात्र त्यांनी आपल्याला बरे वाटत असे निमित्त सांगून पोलिसांशी बोलणे टाळले. आपण कायते न्यायाधिशांसमोर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी याबाबत न्यायदंडाधिकाऱ्यांना कळविले. तेव्हा सोमवारी 22 सप्टेंबर रोजी न्यायदंडाधिकाऱ्यांनी गोमेकॉत भेट दिली असता त्यांच्यासमोरही काणकोणकर यांनी बोलणे टाळले. त्यामुळे रामा काणकोणकर जबानी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला असून हल्ला प्रकरणाला वेगळे वळण लागण्याचा संशय आहे. रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला कशासाठी करण्यात आला ते रामच पोलिसांना व्यवस्थितपणे सांगू शकातात मात्र ते बोलायला तयार नसल्याने  पोलिसांसमोर मोठा यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे.

भाजपच्या गुंडागिरी विरोधात जनजागृती करणार: अॅड. अमित पालेकर

राज्यात भाजप सरकारची गुंडागिरी वाढली असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोप आपचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी केला आहे. सरकारविरोधात जे आवाज उठवतात त्यांना धमकी दिली जाते. त्यात तो ऐकत नसल्यास गुंडांमार्फत मारहाण केली जाते. या प्रकारा विरोधात आपच्यावतीने गोव्यात भाजपची गुंडागिरी नको, असे अभियान सुऊ केले जाईल. गावागावात जाऊन लोकांमध्ये जागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.