ZP Election 2025: आठ हरकती मंजूर, 124 तक्रारी फेटाळल्या, 22 ऑगस्टला अंतिम प्रभाग आराखडा जाहीर
हरकतींदारांची आयुक्तासमोर सुनावणी घेऊन लेखी म्हणणेही घेण्यात आले
कोल्हापूर : जिल्हा परिषद मतदार संघातील जिह्यातील 8 हरकती मंजूर करण्यात आल्या. कागल 5 तर चंदगड तीन हरकतींचा समावेश आहे. 132 पैकी 124 हरकती फेटाळल्या आहेत. मतदार संघाच्या रचनेनुसार हरकतींचा विचार करून फेररचना केल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातील हरकतीबाबत त्या त्या तहसीलदारांनी हरकतीबाबत निकाल बाहेर लावण्यात येत आहेत.
जिल्हा परिषद किंवा पंचायती समितीमधील गण, गट बदलण्यात आला होता. बदललेल्या गण आपल्या पसंतीचा नाही, दिलेल्या गावांची रचना योग्य नाही, अशा जिह्यातील 141 हरकती नोंद करण्यात आल्या होत्या. काही दुभार हरकती होत्या. त्यामुळे एकूण 132 तक्रारी होत्या.
आपण दखल केलेल्या हरकतीवर बदल होईल असा विचार करत अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र कागल 5 आणि चंदगडमधील 3 इतक्याच हरकती मंजूर झाल्या आहेत. हातकणंगले तालुक्यातून सवार्धिक अशा 70 तक्रारी दखल झाल्या होत्या. तर करवीरमधून 39 तक्रारी दखल झाल्या होत्या.
सर्व हरकतींदारांची आयुक्तासमोर सुनावणी घेऊन लेखी म्हणणेही घेण्यात आले होते. करवीर तालुक्यातील 39 सह उर्वरित 124 हरकती विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी फेटाळल्या आहेत. 22 ऑगस्टला अंतिम प्रभाग आराखडा जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, ज्यांच्या हरकती फेटाळल्या आहेत, त्यांना न्यायालयात दाद मागता येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या पाडळी खुर्द, शिंगणापूर, निगवे खालसा, सडोली खालसा यासह इतर प्रभागांमधील गावांमध्ये संलग्नता नाही. या गावामधून नद्यांचा प्रवाह जातो. त्यामुळे पुरादरम्यान एकमेकांशी संपर्क राहण्यास अडचण येते. याशिवाय, कोल्हापूर दक्षिण मतदार संघातही अनेक गावांमध्ये संबंध किंवा संपर्क नसतानाही प्रभाग रचनेत घेतलेली गावांमध्ये बदल करावा, अशी हरकत घेतली होती. मात्र, या सर्व हरकती फेटाळल्या आहेत.
कागल तालुक्यातील पाच आणि चंदगडमधील 3 अशा एकूण आठ हरकतीनूसार प्रभाग रचनेत बदल केला जाणार आहे. दरम्यान, सोमवार (ता. 18) पर्यंत मंजूर केलेल्या हरकतींवर बदल केला जाणार आहे. त्या-त्या हकरतदारांचे मत जाणून घेऊन हे बदल केले जातील.
तशी माहितीही संबंधीत हकरतदारांना दिली आहे. मंजूर हरकतींवर केलेल्या बदलासह पुन्हा हा आराखडा विभागीय आयुक्तांना पाठवला जाणार आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनंतर 22 ऑगस्टला पुन्हा हा आरखडा प्रसिध्द केला जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीची पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.
उच्च न्यायालयात दाद मागणार
काहीच मतदारसंघातीलल बदल झाला आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचना आराखड्यात अनेक चुका आहे. त्यांनी फेरररचना करावी लागणार आहे. या फेररचनेबाबत हकरती घेतल्या होत्या. मात्र, या हरकती फेटाळल्या असल्याने फेररचना करण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
- आमदार सतेज पाटील