छत्तीसगडमध्ये आठ नक्षलींचे आत्मसमर्पण, दोघांना अटक
06:00 AM Apr 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ रायपूर
Advertisement
छत्तीसगडमधील बस्तर विभागातील दंतेवाडा आणि सुकमा जिह्यात शनिवारी आठ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केल. तसेच दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी दिली. जिह्यातील आठ नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलीस आणि निमलष्करी अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केल्याचे त्यांनी सांगितले. आत्मसमर्पण केलेल्यांपैकी दोन नक्षलवाद्यांच्या डोक्यावर लाखोंचे बक्षीस होते. जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन आणि संघटनेतील वाढत्या अंतर्गत मतभेदांमुळे नाराज होऊन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला.
Advertisement
Advertisement