कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाकुंभावरून परतणाऱ्या आठ भाविकांचा मृत्यू

06:42 AM Feb 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पिकअप वाहनाचा एक्सल तुटल्याने लोक ट्रकखाली चिरडले

Advertisement

वृत्तसंस्था/ गाझीपूर

Advertisement

वाराणसी-गाझीपूर-गोरखपूर चौपदरी मार्गावर जिल्ह्यातील नंदगंज भागातील कुस्मी कलान येथे कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या पिकअपचा अॅक्सल तुटल्याने लोक रस्त्यावर पडले. हे लोक पाठोपाठ येणाऱ्या ट्रकखाली चिरडल्याने झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला, चार पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे.

गोरखपूरच्या बांसगाव भागातील हल्दीचक आणि बलोचक येथील 22 जण पिकअपमधून महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रयागराजला गेले होते. शुक्रवारी दुपारी सर्वजण गोरखपूरला परतत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. वाराणसी-गाझीपूर चौपदरी मार्गावर एका पिकअपचा एक्सल अचानक तुटल्यामुळे त्यावर बसलेले लोक खाली पडले. यादरम्यान मागून येणाऱ्या ट्रकने सर्वांना चिरडले. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर आठहून अधिक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाजीपूरमधील रस्ते अपघाताची दखल घेतली आहे. या अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या शोकाकुल कुटुंबियांना शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासोबतच जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article