इजिप्तचा प्रस्ताव हमासने फेटाळला
गाझावरील नियंत्रण सोडण्याची तयारी नाही : नेतान्याहू यांचा हमासला निर्वाणीचा इशारा
वृत्तसंस्था/ जेरूसलेम, गाझा
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याची चिन्हे पुन्हा धुसर झाली आहेत. हमास आणि इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी इजिप्तचा प्रस्ताव फेटाळला आहे. या दोन्ही संघटनांनी गाझावरील नियंत्रण अन्य शक्तीकडे सोपविले तर इस्रायल स्थायी शस्त्रसंधी करणार असा प्रस्ताव इजिप्तकडून मांडण्यात आला होता. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी गाझाचा दौरा केला आहे. गाझामधील प्रत्येक दहशतवादी संघटनेचा कब्जा संपणार नाही तोवर इस्रायलचे सैन्य हे युद्ध थांबविणार नसल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
इजिप्तमध्ये अनेक दिवसांपासून हमास, इस्लामिक जिहाद आणि काही इस्रायली अधिकाऱ्यांदरम्यान चर्चा सुरू होती. याचा उद्देश गाझामध्ये स्थायी शस्त्रसंधी लागू करणे होता. ही चर्चा निष्फळ ठरल्याचे आता समोर आले आहे.
स्थायी शस्त्रसंधी इच्छित असल्यास दोन अटी मान्य कराव्या लागतील. पहिली अट सर्व ओलिसांची त्वरित मुक्तता करावी लागेल, दुसऱ्या अटीनुसार गाझातील सत्ता अन्य शक्ती किंवा संघटनेकडे सोपवावी लागणार असे इजिप्तमधून स्पष्ट करण्यात आले होते. दोन्ही संघटनांनी ही मागणी फेटाळली होती.
इजिप्त आमचा बंधू आहे, परंतु आम्ही त्याच्या दोन्ही सूचना मान्य करू शत नाही. सर्वप्रथम इस्रायलकडून हल्ले थांबायला हवेत. यानंतरच कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ शकेल. यात ओलिसांची सुटका देखील सामील असल्याचे हमासच्या एका नेत्याने सांगितले आहे. या चर्चेत कतार देखील सामील होता.
गाझाच्या शाळेतून शस्त्रास्त्रs हस्तगत
गाझा सिटीच्या दाराज आणि तुफा भागांमध्ये इस्रायलच्या सैन्याने कारवाई केली आहे. यादरम्यान एका शाळेतून घातक शस्त्रास्त्रs आणि आत्मघाती हल्ल्यांसाठी वापरण्यात येणारी जॅकेट्स हस्तगत करण्यात आली आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या हमासच्या एका दहशतवाद्याने चौकशीत या शाळेविषयी माहिती पुरविली होती. या शाळेवरील कारवाईदरम्यान शस्त्रास्त्रs अन् सुसाइड जॅकेट्स मिळण्यासोबत अनेक दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आल्याचे इस्रायलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.