For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इजिप्तची पंचांविरुद्ध ‘फिफा’कडे तक्रार

06:45 AM Jul 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
इजिप्तची पंचांविरुद्ध ‘फिफा’कडे तक्रार
Advertisement

वृत्तसंस्था, कैरो : संतप्त झालेले इजिप्तचे व्यवस्थापक होसाम हसन यांनी फिफावर लायोनेल मेस्सीला 2026 च्या विश्वचषकात ठेवण्याची इच्छा बाळगून स्वत:च्या हितसंबंधांचे’ रक्षण करीत असल्याचा आरोप केला आहे. अर्जेंटिनाविऊद्धच्या वादग्रस्त 3-2 पराभवात आपल्या संघावर अन्याय झाला, ज्यामुळे इजिप्तचा स्पर्धेतील प्रवास 16 संघांच्या फेरीतच थांबला, असा दावा त्यांनी केला.

Advertisement

इजिप्तने गतविजेत्या अर्जेंटिनाला कडवी झुंज दिली, परंतु 79 व्या मिनिटापासून झालेल्या तीन गोलांमुळे अर्जेंटिना संघाने आपले आव्हान कायम राखले आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता इजिप्शियन फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष हानी अबो रिदा यांनी फ्रेंच पंच फ्रान्स्वा लेटेक्सियर आणि त्यांच्या पंच मंडळाविऊद्ध फिफाकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. सामन्यादरम्यान मैदानावरील ‘व्हीएआर’ पुनरावलोकनात असे निश्चित झाले की, इजिप्तच्या खेळाडूने फटकावलेला चेंडू अर्जेंटिनाच्या जाळ्यात जाण्याच्या सुमारे 20 सेकंद आधी एक नियमभंग झाला होता. त्यामुळे इजिप्तच्या मोस्तफा झिकोने दुसऱ्या सत्रात केलेला गोल अवैध ठरवण्यात आला. हा निर्णय सामन्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला, ज्यामुळे इजिप्तच्या संघातील निराशा अधिकच वाढली होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.